Maharashtra Assembly Election 2024 | भाजपकडून विधानसभेच्या रणनीतीमध्ये बदल; आता मतदार यादी अन् बूथ हीच युद्धभूमी असणार

BJP

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. त्यानंतर आता मिळालेल्या पराभवावर चिंतन करून भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) करिष्मा, राममंदिर, कलम ३७० हे मुद्दे तारतील, असा विश्वास असल्याने बूथ पातळीपर्यंतच्या प्रचाराच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाले अन् भाजपला त्याचा फटका बसला.

दरम्यान आता हे वास्तव समोर आल्यानंतर भाजपने रणनीतीमध्ये बदल केला आहे. मतदार यादी अन् बूथ हीच युद्धभूमी मानून तिथे लढा, असे आदेश प्रदेश भाजपच्या बैठकीत देण्यात आले आहेत. भाजपचे (BJP) राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ही ऑनलाइन बैठक घेतली. बैठकीला सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख आदी उपस्थित होते.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन मोठ्या नेत्यांच्या सभा होतील, असे नियोजन आम्ही केलेले आहे. यापेक्षा जास्त सभांची अपेक्षा करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या सभा ठरलेल्या आहेत.

या बैठकीत शिवप्रकाश आणि बावनकुळे म्हणाले , ” ऐनवेळी अधिक सभा मागण्याचा आग्रह धरू नका. मोठ्या सभांवर अधिक खर्च आणि वेळ जातो, त्यापेक्षा बूथनिहाय सूक्ष्म नियोजनावर भर द्या, भाजपचा प्रभाव असलेले ‘ए’ ग्रेडचे बूथ आहेत तिथे भाजपचे १० टक्के मतदान आणि बी, सी, डी ग्रेडच्या बूथवर १० टक्के मतदान वाढेल, याची दक्षता घ्या.”

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, हा मुद्दा प्रभावीपणे मांडला जाणार आहे. नागपुरातील एका काँग्रेस नेत्याने या योजनेला उच्च न्यायालयात दिलेले आव्हान, काँग्रेस नेत्यांनी याबाबत केलेली विधाने यांचा संदर्भ दिला जाईल.

लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरतीच असल्याचा ‘फेक नरेटिव्ह’ आघाडीने तयार केला आहे. प्रत्यक्षात या योजनेत वर्षभर पैसा मिळेल याची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगा, असे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत. तसेच महायुती सरकारने वर्षभरात घेतलेले निर्णय त्यामध्ये वीजबिल माफी, महामंडळे याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहनही या बैठकीतून करण्यात आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवणं शिवसेना शिंदे गटाच्या अंगलट, चौकशी होणार; शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Baramati Assembly Election 2024 | ‘तीन ठिकाणांवरून ऑफर होती, यंदा बारामतीतून उभा राहणार नव्हतो’, अजित पवारांचे वक्तव्य

Pune Crime News | भागीदारीतील कंपनीतून मेटरियल घेऊन स्वत:च्या कंपन्यांमार्फत विक्री करुन 2 कोटी 31 लाखांची फसवणूक

You may have missed