Maharashtra Assembly Election 2024 | ‘आम्ही कोणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही’, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे वक्तव्य

Uddhav Thackeray-Rahul Gandhi

नागपूर : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीची (Mahayuti) तयारी सुरु झालेली आहे. दरम्यान मविआ चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार याबाबत मतमतांतरे असताना काँग्रेसचे महाराष्ट्र (Maharashtra Congress) प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडी एकत्र म्हणून निवडणूक लढणार आहे. जागावाटपबाबत दोनदा चर्चा झालेल्या आहेत. लवकरच पुन्हा एक बैठक होईल. मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीनंतर एकत्रितपणे ठरवू. आम्ही कोणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

चेन्नीथला माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमच्यात कुठलेही मतभेद नाही. सर्वांना घेऊन चालू, आघाडी धर्म पाळू. महाराष्ट्र ही काँग्रेसचे भूमी आहे. त्यामुळे जास्त जागा लढण्यासाठी मागू, असा युक्तिवादही त्यांनी केला. अजित पवार यांनी भलेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात माफी मागितली असेल मात्र महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली.

पुतळा कोणी बनवला, त्याचा पक्षाशी काय संबंध आहे, ही दुर्घटना कशी झाली, असे प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्राचा जो अपमान झाला त्यावर केवळ माफी मागून होणार नाही, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. पुतळा पडला, जनतेचा पैसा गेला. देवेंद्र फडणवीस यांनी हे कोणी केले ते पाहून त्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

संजय राऊत हे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्रोजेक्ट करीत आहेत.
याबाबत पत्रकारांनी विचारले असता काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले,
प्रत्येक पक्ष आपापले बोलत असतो. आमचे कार्यकर्ते आमचे कोणाचे नाव घेत असतील तर त्यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही.

मविआच्या दोन बैठका झाल्या आहेत. जागा वाटपाचा प्रश्न लवकरच सोडवू, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे काम सुरू आहे. महायुती सरकार घाबरले आहे.
सरकारी खर्चाने प्रचार चालला आहे, असा आरोपही महायुती सरकारवर त्यांनी यावेळी केला. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना