Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले – “निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

BJP MLAs Meeting

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विभागनिहाय भाजप आमदारांच्या बैठका घेत असल्याचे चित्र आहे. तसेच काल वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत त्यांनी विधानसभेच्या दृष्टिकोनातून आमदारांना कानमंत्र दिला. (Maharashtra Assembly Election 2024)

देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करेल असंही त्यांनी आमदारांना सांगितलं आहे. लोकसभेत ज्या-ज्या मुद्यांवर फटका बसला, त्याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.

मराठा आरक्षण (Maratha Reservation), ओबीसी आरक्षण (OBC Reservation), याचबरोबरच शेतमालाचा भाव यावरही आमदारांसोबत फडणवीसांनी चर्चा केली आहे. लाडकी बहिण (Ladli Behna Yojana), युवा प्रशिक्षण या योजना प्रत्येक गावात पोहोचवा. महायुतीच्या (Mahayuti) स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करा, अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकिट देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळं आता आमदारांची धाकधूक वाढली आहे.

या बैठकीला दौंड तालुक्याचे (Daund Assembly Constituency) आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul), माण-खटाव चे (Man Khatav Assembly Constituency) आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore), बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Barshi Assembly Contituency – MLA Rajendra Raut), माळशिरसचे (Malshiras Assembly Constituency) आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute), भोसरीचे (Bhosari Assembly Constituency) आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge), चिंचवडच्या आमदार (Chinchwad Assembly Constituency) अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap), शिवाजीनगरचे (Shivaji Nagar Assembly) आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole), पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनिल कांबळे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर, पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, उत्तर सोलापूरचे आमदार विजय देशमुख आणि सांगली विधानसभेचे आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते.

येत्या २० ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेऊन महायुतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. महायुतीच्या नेत्यांचे दौरे आणि जाहीर सभा येत्या २० ऑगस्टपासून कोल्हापूर येथून सुरू होईल. यावेळी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यंत्री उपस्थित राहतील. महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर जाहीर सभा पार पडणार असल्याची माहिती आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन

Pune ACB Trap Case | अबब! दीड लाखांसाठी 50 हजारांची मागितली लाच; PMRDA चे अभियंता,
इंजिनिअरसह तिघांना अटक

Hadapsar Pune Crime News | हडपसरमधील ‘त्या’ रिव्हर्स थरारमधील कारण आले पुढे;
पिकअप वाहन चालकावर गुन्हा दाखल

You may have missed