Maharashtra Assembly Election 2024 | उमेदवारीच्या तिकीटाची लॉटरी कोणाला लागणार?; विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पक्षाकडून (Sharad Pawar NCP) जोरदार तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले होते. १० पैकी ८ खासदार निवडून आले होते. त्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखत शरद पवार गटाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यंदा सरकार उलथून टाकायचे या हेतूनेच शरद पवार यांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे.
https://www.instagram.com/p/DAiYEYpJJVD
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तुतारी (Tutari) चिन्हावर निवडणूक लढवण्याची अनेकांना इच्छा आहे. हे इच्छुक उमेदवार शरद पवारांची भेट घेताना दिसत आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आमदार बबन शिंदे (MLA Baban Shinde), काँग्रेसचे नेते आबा बागुल (Aaba Bagul), सुरेंद्र पठारे (Surendra Pathare), अमित भांगरे (Amit Bhangre) यांनी आज पवारांची भेट घेत चर्चा केली. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे.
https://www.instagram.com/p/DAiZVihiLTV
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)