Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीत चिंचवड मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला?, मोरेश्वर भोंडवेंच्या पक्ष प्रवेशाने राजकीय घडामोडींना वेग

Moreshwar Bhondve

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चिंचवड विधानसभा मतदारसंघ (Chinchwad Assembly Election 2024) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या (Sharad Pawar NCP) वाट्याला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण कालच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे (Moreshwar Bhondve) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena Thackeray Group) प्रवेश केला. त्यामुळे आता चिंचवडची जागा ठाकरे गटाला मिळणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

https://www.instagram.com/p/DBRIKBdJ4jm

मोरेश्वर भोंडवे हे चिंचवड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यासाठीच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याची चर्चा आहे. चिंचवडची जागा राष्ट्रवादीला मिळण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न करावा, अशी मागणीही त्यांनी अनेकदा केली. पण जागावाटपात चिंचवडची जागा भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित झाले, त्यामुळे त्यांनी आपला मार्ग बदलला.

दुसरीकडे, चिंचवडच्या भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने शंकर जगतापांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Daron Acemoglu News | अभिमानास्पद ! नोबेल पारितोषिक विजेत्याने ‘पुणे न्यूज’ची बातमी
शेअर करुन आपल्याला पारितोषिकाने सन्मानित केल्याची केली घोषणा

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत वादंग! ‘काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका’,
भाजपचा शिवसेना शिंदे गटाला इशारा

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुण्यातील इच्छुक उमेदवारांना समज;
म्हणाले – ‘पक्ष ज्याला उमेदवारी देईल…’

Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी-भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार; फडणवीसांसह अजित पवारांना आणखी एक धक्का

You may have missed