Maharashtra Assembly Election Results 2024 | विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी पिछेहाट, मल्लिकार्जुन खरगेंनी राज्यातील नेत्यांना खडसावलं; म्हणाले – ‘ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधातील टीका यामुळे…’

mallikarjun kharge

दिल्ली : Maharashtra Assembly Election Results 2024 | राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Maharashtra Congress) मोठा फटका बसला. हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निकालावरून काँग्रेसची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. दरम्यान आगामी काळातील रणनीती काय असावी या संदर्भाने दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी राज्यातील नेत्यांना खडसावलं आहे. किती दिवस राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांवर अवलंबून राहणार? असा सवाल खरगेंनी उपस्थित केला आहे.

बैठकीत बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ” आपण निवडणूक हरलो असू, पण बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक विषमता हे ज्वलंत प्रश्न आहेत यात शंका नाही. जातीय जनगणना हा देखील आज महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यघटना, सामाजिक न्याय, समरसता हे प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आपण निवडणूक असलेल्या राज्यांमधील महत्त्वाचे स्थानिक मुद्दे विसरतो.

राज्यांच्या विविध समस्या वेळीच तपशीलवार समजून घेणे आणि त्यांच्याभोवती ठोस मोहिमेची रणनीती बनवणे देखील महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय प्रश्न आणि राष्ट्रीय नेत्यांच्या मदतीने राज्याच्या निवडणुका कधीपर्यंत लढणार आहात?”, असे खरगे यांनी म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले, ” ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधातील टीका यामुळे आपले खूप नुकसान होत आहे. जोपर्यंत आपण एकदिलाने निवडणुका लढवणार नाही आणि एकमेकांविरुद्ध वक्तव्ये करणे बंद करणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या विरोधकांचा राजकीय पराभव कसा करू शकणार आहोत का? त्यामुळे आपण शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचे आहे. आपण सर्व परिस्थितीत एकजूट ठेवली पाहिजे”, असेही खरगे यांनी बैठकीत सांगितले. (Maharashtra Assembly Election Results 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed