Maharashtra Assembly Election Results 2024 | महायुतीच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदे? जाणून घ्या
मुंबई : Maharashtra Assembly Election Results 2024 | विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. महायुतीला प्रचंड मोठे मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये भाजपचा (BJP) १४८ जागांपैकी १३२ जागांवर, शिंदे गटाचा (Shivsena Shinde Group) ८५ जागांपैकी ५७ जागांवर तर अजित पवार (Ajit Pawar NCP) गटाचा ५१ जागांपैकी ४१ जागांवर विजय झाला आहे. राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ २६ तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार (Mahayuti Govt) स्थापन होणार असल्याची माहिती आहे.
त्यामुळे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शपथविधी कधी होणार? कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार? मुख्यमंत्र्यांबरोबर कोण -कोण शपथ घेणार? उपमुख्यमंत्री किती असणार? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचा मंत्रिपदाबाबतचा फॉर्म्युला ठरलेला आहे.
त्यानुसार सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे सध्या १३२ आमदार आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला २२-२४ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ५७ जागा आल्याने त्यांच्या वाट्याला १०-१२ मंत्रिपदे येण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी कांग्रेसला ४१ जागा आल्याने त्यांच्या वाट्याला ८-१० मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावर महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून चर्चा करणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra Assembly Election Results 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट