Maharashtra Assembly Election Results 2024 | 48 टक्के मते मिळवित महायुतीने पटकविल्या 229 जागा

Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-Ajit-Pawar

अजित पवारांपेक्षा शरद पवार यांच्या पक्षाला अधिक मते, जागा मात्र अजित पवारांच्या पक्षाला अधिक

पुणे : Maharashtra Assembly Election Results 2024 | महायुतीतील (Mahayuti) तीन पक्षांनी आतापर्यंत ४८.४५ टक्के मते मिळवित तब्बल २२९ जागांवर आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाने तब्बल १ कोटी ४५ लाख मते आतापर्यंत मिळविली असून १२९ जागांवर आघाडी मिळविली आहे.

त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १२.५८ टक्के मते मिळविली असून त्यांना आतापर्यंत ६९ लाख ७२ हजार ८५५ मते मिळाली असून ५४ जागांवर शिवसेना आघाडीवर आहेत.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ९.६८ टक्के मते मिळाली आहेत. त्यांनी ५३ लाख ६३ हजार मते मिळवत ४० जागांवर आघाडी मिळविली आहे. दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) केवळ ३५.४५ टक्के मते मिळविता आली आहे. पण त्यांना केवळ ५३ जागांवर समाधान मानावे लागत आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला १२.५७ टक्के आणि ५९ लाख २१ हजार मते मिळाली आहेत. पण २२ जागावरच ते आघाडीवर आहेत. शिंदेसेनेपेक्षा त्यांना जवळपास १० लाख मते कमी मिळाली आहेत. त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ११.३१ टक्के आणि ६३ लाख १८ हजार मते मिळाली आहेत. मात्र ते केवळ ११ जागांवर आघाडीवर आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा त्यांना जवळपास १० लाख मते अधिक मिळाली आहेत.

इतरांना १३.७९ टक्के आणि एकूण ७८ लाख ८६ हजार मते मिळाली आहेत.

पक्षाला आतापर्यंत मिळालेली मते

भाजप १४५२०८४५
शिंदेसेना ६९७२८५५
राष्ट्रवादी अजित पवार ५३६३६९८
काँग्रेस ६४६४८८३
ठाकरे सेना ५९२१५८७
राष्ट्रवादी शरद पवार ६३१८३२६
इतर ७८८६०८०

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट