Maharashtra Assembly Special Session | आमदारांच्या शपथविधीवेळी नाट्यमय घडामोडी; मविआचे आमदार शपथ घेणार नाहीत; ‘हे’ कारण आले समोर

Mahavikas Aghadi-Shivsena UBT

मुंबई : Maharashtra Assembly Special Session | विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. २८८ जागांपैकी २३० हुन अधिक जागा महायुतीला मिळाल्या. दरम्यान (दि.५) देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या इतर आमदारांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. मात्र महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा (EVM Scam) आरोप करत आज आमदारकीची शपथ घेणं टाळलं आहे.

विधानभवनात आमदारांचा शपथविधी सुरू होताच महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress), शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group), राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar Group) या पक्षांचे आमदार सभात्याग करत बाहेर पडले. या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि नंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

“ईव्हीएममध्ये गडबड करून हे सरकार स्थापन झालं आहे.
महायुतीला मिळालेलं पाशवी बहुमत हे जनतेचा जनादेश नसून ईव्हीएमची कमाल आहे”,
असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
यांच्या दालनात सध्या महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक सुरू असून
या बैठकीत आमदारकीची शपथ घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. (Maharashtra Assembly Special Session)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sangli Crime News | शेततळ्यात बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू ; तळ्याजवळ खेळत असताना घडली दुर्घटना

Pune Swargate Crime News | भरदिवसात गर्दीने भरलेल्या बसमध्ये तरुणीशी अश्लिल कृत्य; मैत्रिणींनी खडसावले, स्वारगेटजवळील प्रकार

You may have missed