Maharashtra Band | महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक; महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
मुंबई : Maharashtra Band | बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या (Badlapur School Girl Incident) घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूर येथील घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. राज्यभरात सातत्याने महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईत आज महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, खासदार वर्षा गायकवाड आणि नसीम खान यांची उपस्थिती होती.
या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
‘आजच्या बैठकीत आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. कारण, महाराष्ट्र मनाने अस्वस्थ असून पेटलेला आहे.
त्यामुळे आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. सरकारने तातडीने महिला अत्याचाराच्या घटना रोखाव्यात’, असं संजय राऊत म्हणाले.
येत्या २४ तारखेला आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
या बंदला सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन देखील संजय राऊत यांनी केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून
Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”
Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?