Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु; अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट
मुंबई : Maharashtra Cabinet Expansion | लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. त्यानंतर अधिवेशनात महायुती सरकारने (Mahayuti Govt) अनेक योजनांची घोषणा केली. दरम्यान अधिवेशनाच्या अगोदरपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. दोन-तीन महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार करावा का, याबाबत विचारविनिमय सुरु आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली.
या बैठकीत मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार व पुढील दोन-तीन महिन्यात होणाऱ्या विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) या दोन्ही मुद्दयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.
महायुती सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली असून आता तरी मंत्रिमंडळ विस्तार व महामंडळ नियुक्त्या करून पक्षातील नेत्यांना संधी द्यावी, अशी मागणी तीनही पक्षांमधील नेत्यांकडून वरिष्ठांकडे होत आहे. तीनही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून मंत्रिमंडळ व महामंडळांमध्ये जागा मर्यादित आहेत आणि त्याचे वाटप तीनही पक्षांत कसे करायचे, याबाबत वाद आहेत. त्यामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी विस्तार व महामंडळ नियुक्त्या टाळल्या आहेत. मात्र विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त बारा सदस्यांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, अशी माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी महायुतीच्या विरोधात कौल दिल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही
तर महाविकास आघाडी आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार असल्याने ऐन निवडणुकीत महायुतीची कोंडी होणार आहे.
त्यामुळे या मुद्यावरही अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड