Maharashtra Cosmopolitan Education Society | महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त 28 नोव्हेंबर रोजी अभिवादन मिरवणूक ! महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम
पुणे : Maharashtra Cosmopolitan Education Society | महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि आझम कॅम्पसमधील (Azam Campus In Camp Pune) संलग्न संस्थांच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त (Mahatma Jyotiba Phule Punyatithi) अभिवादन मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक गुरुवार, दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी साडेआठ वाजता आझम कॅम्पस(पुणे कॅम्प) येथून निघणार आहे.
मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तसेच डॉ. पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.संस्थेच्या ३० आस्थापनांमधील ८ हजार विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी अभिवादन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील.महात्मा फुलेंच्या वेशातील विद्यार्थी बग्गीत बसणार आहेत.दरबार ब्रास बँड,बग्गी, बैलगाडी,महात्मा फुलेंचे सामाजिक संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी,पदाधिकारी,शिक्षक,प्राध्यापक सहभागी होणार आहेत.
मिरवणुकीचा मार्ग आझम कॅम्पस, पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली बिल्डींग, काशीवाडी, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक, महात्मा फुले वाडा ( समताभूमी)असा आहे.
अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे २० वे वर्ष आहे. दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी( आझम कॅम्पस)च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या
Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’
Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन
Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार