Maharashtra First Lady CM | लाडकी बहीण योजनेला महिला मुख्यमंत्री पर्याय ठरेल? कोणाची वर्णी लागणार? ‘ही’ नावे चर्चेत

मुंबई : Maharashtra First Lady CM | राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) घोषणा होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारने (Mahayuti Govt) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) जाहीर करुन समस्त महिला वर्गाला आकर्षित करुन घेतले आहे. राज्यात सध्या या योजनेची जोरदार चर्चा असून यातील दोन हप्ते सरकारने महिलांच्या थेट खात्यात जमाही केले आहेत. त्यामुळे विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटात अस्वस्थता आहेच.
पण या योजनेला टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्नही त्यांच्याकडून सुरु आहे. पण आता यामध्ये एक ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. जर महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनाला महाविकास आघाडीला पर्याय आणायला असेल तर मुख्यमंत्रीपदासाठी महिलेचे नाव जाहीर करण्याची संधी आहे.
जर हे झालं तर राज्याला गेल्या ७३ वर्षात पहिल्यांदाच महिला मुख्यमंत्री लाभू शकेल. तसंच याला राजकीय नेत्यांसह नागरिकांचा देखील विरोध असू शकणार नाही. त्यामुळे एक वेगळंच राजकारण राज्यात सुरु होऊ शकतं.
महाविकास आघाडीने जर महिला मुख्यमंत्री करायचे ठरवले तर त्यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या अनुभवी नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule),
काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur),
उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray). तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोन्हे (Neelam Gorhe),
भाजपकडून आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावाचा पर्याय असू शकतो.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा