Maharashtra Govt formation Updates | आज-उद्या शपथविधी होणार नसल्याची माहिती, पडद्यामागील महत्वाच्या घडामोडी समोर

Mahayuti

मुंबई : Maharashtra Govt formation Updates | विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दरम्यान, आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नावे आहेत. दोन्ही पक्षांकडून आपला नेताच मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी नेमका कधी होणार? याबाबतची माहिती समोर आली आहे. आज किंवा उद्या शपथविधी होणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार (Ajit Pawar) पक्षाचे विधान परिषद सदस्य तथा प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, ” काल आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. तसेच काल कराडच्या प्रीतीसंगमावर असताना आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी सांगितलं की ३० नोव्हेंबरपर्यंत शपथविधीची घाई नाही. त्यामुळे मला वाटत नाही आज किंवा उद्या शपथविधी होईल. माझ्या माहितीप्रमाणे ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर रोजी शपथविधी पार पडेल.

ते पुढे म्हणाले, ” आमच्या पक्षाचे आमदार व कार्यकर्त्यांना शपथविधीच्या कार्यक्रमासाठी अद्याप बोलावणं आलेलं नाही. आम्ही सध्या घरीच आहोत त्यामुळे आज आणि उद्या शपथविधी होईल असं मला तरी वाटत नाही. महायुतीला तूर्तास शपथविधीची घाई वाटत नाही. आमच्या माहितीप्रमाणे १ डिसेंबर हीच तारीख ठरलेली आहे. मुख्यमंत्रिपद व शपथविधीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घोषणा करतील”, असे अमोल मिटकरी यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारीत असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत

You may have missed