Maharashtra Kesari Winner Vetal Shelke | सोलापूरचा वेताळ शेळके यंदाच्या 66 व्या महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्याचा विजेता; पृथ्वीराज पाटीलला धूळ चारत पटकावली मानाची गदा

Vetal Shelke

अहिल्यानगर : Maharashtra Kesari Winner Vetal Shelke | सोलापूरचा वेताळ शेळके यंदाच्या ६६ व्या महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्याचा विजेता ठरला आहे. अटीतटीच्या अंतिम सामन्यात वेताळ शेळकेने पृथ्वीराज पाटीलला पराभवाची धूळ चारत गदा आपल्या नावावर केली आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ आणि आमदार रोहित पवार मित्रमंडळातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

अहिल्यानगरमधील दादा पाटील महाविद्यालयाजवळील मैदानात महाराष्ट्र केसरीचा थरार रंगला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाअंतिम सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

मानाच्या महाराष्ट्र केसरी गदेसाठी पृथ्वीराज आणि वेताळ या दोघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. मात्र अखेरीस वेताळ पृथ्वीराजवर सरस ठरला. वेताळ शेळकेने ७ गुण पटकावत मुंबईच्या पृथ्वीराज पाटीलला चितपट केले. वेताळ शेळकेने मानाची गदा पटकावली. तर पृथ्वीराजला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं आहे.

You may have missed