Maharashtra Politics | कोट्यवधी रूपयांची बक्षीसं मिळाली, तरीही क्रिकेटर्सवर सरकारी तिजोरीतून 11 कोटी उधळले, विरोधकांची टीका, ”मुख्यमंत्र्यांनी खिशातून…”

Rohit Sharma On Varsha Bungalow

मुंबई : Maharashtra Politics | काल महाराष्ट्राच्या विधीमंडळात खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma), सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadhav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यांचा आयसीसी टी-२० विश्वचषकात विजय मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी सरकारी तिजोरीतून ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. (Maharashtra Politics)

भारतीय संघावर कोट्यवधीची उधळण बीसीसीआयने केलेली असताना पुन्हा ११ कोटी राज्याच्या तिजोरीतून देण्याची गरजच नव्हती, असे दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे.

याबाबत विधानसेभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, भारतीय संघाने विश्वचषक जिंकला याचा सर्वांनाच आनंद आहे. त्यांना कोट्यवधीची बक्षीसे जाहीर झाली आहेत. मुंबईच्या मरीन डड्ढाईव्हवर जमलेल्या लाखो चाहत्यांच्या भावनेकडे पाहून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली असावी, असे दिसते.

वडेट्टीवार म्हणाले, सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची काही गरज नव्हती. मुंबईकर चार खेळाडूंना एक-एक कोटी देण्याची घोषणा झाली होतीच. मग इतर खेळाडूंना बक्षीस देण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. क्रिकेटपटूंना आधीच खूप पैसे मिळाले आहेत. क्रिकेटपटू पैशांसाठी नाही तर देशासाठी खेळतात, मग त्यांना पैसे का देत आहात? असा प्रश्न त्यांनी विचारला.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, ४ महिन्यात १,०६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांना जर मदत मिळत नसेल तर सरकारचा पर्दाफाश जनता करेल. क्रिकेट खेळाडूंना बीसीसीआयने १२५ कोटी दिले असतानाही सरकारी तिजोरीतून पैसे देण्याची गरज नव्हती. स्वतःची पाठ थोपटवून घेण्यासाठी हे बक्षीस दिले. गरीब मेला तरी चालेल पण सरकारला थाप मिळाली पाहीजे, हा यांचा उद्देश दिसतो.

तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले,
सरकारी तिजोरीतून बक्षीस देण्याची गरज नव्हती. खेळाडूंनाही बक्षिसाची गरज नाही.
बीसीसीआयकडून त्यांना खूप मानधन मिळते.
एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून बक्षीस द्यायला हवे होते.

दरम्यान, हा वाद सुरू असताना भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी भलतीच मागणी केली आहे.
लाड यांनी म्हटले की, भारतीय संघाला १५ कोटी रुपये द्यायला हवेत.
संघात १५ खेळाडू असल्याने त्यांना १५ कोटींचे बक्षीस द्यायला हवेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Leopard Dive Ghat Pune | पुणे : दिवे घाटात भररस्त्यात प्रवाशांना बिबट्याचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल (Video)

Ravet Pune Crime News | पिंपरी: जागेच्या व्यवहारात महिलेची फसवणूक, डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल

You may have missed