Maharashtra Politics | आधी भ्रष्टाचाराचे आरोप मग भाजपात प्रवेश; घोटाळ्याचे आरोप असलेल्या नेत्यांमुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार?

Ajit Pawar-Nawab Malik-Chhagan Bhujbal

मुंबई: Maharashtra Politics | आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सुरु झालेली आहे. दरम्यान नेत्यांवर आरोप केल्यानंतर त्यांना पक्षात घेऊन भाजपने मोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. भाजपची (BJP) हीच कृती आता भाजपची डोकेदुखी बनत चालली आहे. विरोधक हाच मुद्दा पकडून प्रचार करताना दिसत आहेत.

महायुती (Mahayuti) अधिक बळकट करण्यासाठी भाजपने अजित पवारांसह (Ajit Pawar) इतर पक्षातील नेत्यांनाही सोबत घेतले. मात्र अजित पवारांच्या राष्ट्र्वादीतल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. हेच आरोप भाजपच्या नेत्यांनी केले होते. मात्र आता त्याच नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ भाजपवर आली आहे.

अजित पवारांवर सिंचन प्रकल्पात ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप (Irrigation Scam Maharashtra), अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप तर नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली, सलीम पटेल यांच्याकडून जमीन खरेदीचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. आता हे नेते महायुतीत (Mahayuti) असल्याने विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.

विरोधी पक्षांमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजप करत आहे. त्या आरोपांनंतर केंद्रीय संस्थांकडून चौकशी केली जाते. या काळात त्या नेत्यांवर भाजपात येण्यासाठी दबाव टाकला जातो, असा आरोप काँग्रेससह देशभरातील सर्वच विरोधी पक्ष सातत्याने करतात. दुसरीकडे भाजपने आरोप केलेल्या या नेत्यांचे आज राजकीय पुनर्वसन भाजपमुळे होत असल्याची टीकाही विरोधकांकडून होत आहे.

आरोपानंतर अजित पवारांसोबत भाजपने घरोबा केल्यानंतर ते आता उपमुख्यमंत्री आहेत. अशोक चव्हाणांनी थेट भाजपात प्रवेश केला त्यांची वर्णी राज्यसभेवर लागली. छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. संजय राठोड (Sanjay Rathod) जलसंधारण मंत्री आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांआधी राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली. त्याच्या केंद्रस्थानी भाजपच होती. दुसरीकडे अजित पवारांच्या प्रवेशाने भाजपला स्वकीयांनीच लक्ष्य केले. आगामी विधानसभेतही त्याचे पडसाद उमटणार का आणि आरोपांनी बरबटलेल्या नेत्यांच्या सत्तेतील सहभागाने भाजपचीच डोकेदुखी आणखी वाढणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed