Maharashtra Politics News | महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार? विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग

मुंबई: Maharashtra Politics News | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. महायुतीत (Mahayuti) राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar NCP) बाहेर पडू शकतो अशी शक्यता व्यक्त होतेय. अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं म्ह्णून भाजप (BJP) आणि शिवसेनेकडून (Shivsena Shinde Group) प्रयत्न सुरु असल्याचे म्हंटले जातेय.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत सध्या जागावाटपावरून बैठका सुरु आहेत. कोण किती जागांवर लढणार याबाबत वरिष्ठांमध्ये चर्चेची खलबंत रंगत आहेत. यावरून तिन्ही पक्षात सातत्याने वाद होत असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी, असा प्लॅन भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आखला असल्याची माहिती आहे.
अजित पवार जर महायुतीत राहिल्यास भाजप आणि शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा येतील. पण ते जर बाहेर पडल्यास अधिकाअधिक जागा लढवता येतील. त्यामुळे दोन्ही पक्षाने अजित पवारांवर बाहेर पडण्यास दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. जर अजित पवार महायुतीत राहिल्यास त्यांना कमीत कमी जागा घेऊन निवडणूक लढवावी लागेल.
अजित पवारांना जर ही तडजोड स्वीकारायची नसेल तर वेगळे होऊन लढण्याशिवाय त्यांना पर्याय उरणार नाही, असे राजकीय जाणकार सांगतात. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधात भाजपचे इच्छुक तयारी करत असल्याने अजित पवारांची कोंडी होत असल्याचे पाहायला मिळतंय. त्यामुळे जागावाटपातील अपेक्षाभंगाचं कारण देत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला (Mahayuti Seat Sharing Formula)
अद्याप ठरलेला नाही. मात्र, भाजप १६०-१७० जागा लढवण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील १०० जागांची मागणी केली आहे.
यापैकी किमान ९० जागा पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
अजित पवार यांनी जरी ८० ते ९० जागांची मागणी केली असली, तरी त्यांच्या वाट्याला जेमतेम २०-२५ जागाच येण्याची शक्यता आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्या गुन्हेगाराला अटक
Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)