Maharashtra Politics News | ‘पराभव दिसू लागल्यानेच अमित शहांना शरद पवारांची धास्ती’, अमोल कोल्हेंचे टीकास्त्र; म्हणाले – ‘अभी विधानसभा बाकी है’
नाशिक : Maharashtra Politics News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकेमकांवर टीका करताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्य हातातून जाते की काय अशी भीती भाजपाला (BJP) वाटू लागली आहे. त्यामुळेच राज्यात अमित शहांचे (Amit Shah) दौरे वाढलेले आहेत. विधानसभेसाठी शहांनी विशेष लक्ष घातले आहे.
https://www.instagram.com/p/DAYqPO6J2Bi
शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना रोखायचे आहे, असे पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अमित शहांवर निशाणा साधत सिन्नर सभा (Sinnar Assembly Constituency) गाजवली. शिवस्वराज्य यात्रेत (Shivswaraj Yatra) बोलताना त्यांनी शहा यांचा चांगलाच समाचार घेतला. तर भाजपच्या धोरणांवर टीका केली.
https://www.instagram.com/p/DAYipUsiv4g
राज्यातील सरकार ५० खोक्यांच्या मागे धावणारे आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार लोकांनी निवडून आणले. ही तर ‘लोकसभेसाठी अभी झाकी है, अभी विधानसभा बाकी है’, या शब्दात खासदार कोल्हे यांनी भाजपचा समाचार घेतला.
https://www.instagram.com/p/DAYhXKbiNmu
अमोल कोल्हे म्हणाले, “राज्यातील महायुतीच्या सरकारने सव्वा लाख कोटी रुपये कर्जासाठी पत्र दिले आहे. राज्य सरकारकडे पैसा नाही. लाडकी बहिण आणि लोकांसाठी कर्ज काढायची वेळ या सरकारवर आली आहे. खिशात नाही दमडा, पण मला बाजीराव म्हणा, अशी अवस्था या तिन्ही पक्षांची झाली आहे. महाराष्ट्र सरकारची परिस्थिती बिघडली आहे.
https://www.instagram.com/p/DAYdkn-CXij
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अटकाव करण्यासाठी सगळ्यांनी काम करावे, असा आदेश अमित शहा यांनी दिला आहे. याचा अर्थ त्यांना आपला पराभव आता दिसू लागला आहे.
https://www.instagram.com/p/DAYZ1KKTQVz
ते पुढे म्हणाले, ” शेतकऱ्यांच्या ताटात जेव्हा माती कालवली जाते, तेव्हा गुलाबी जॅकेट वाले का बर गप्प बसतात? शेतीमालाला भाव नाही. कांद्याला जेव्हा चांगला भाव येतो, तेव्हा निर्यात बंदी होते. सोयाबीन आयात केली जाते. त्याचे भाव पाडले जातात. दूध आयात करण्यात येते. हे सगळे भाजप सरकारचे डाव आहेत. त्यांना जागा दाखवण्यासाठी नागरिकांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्यावा”, असे आवाहन त्यांनी केले.
https://www.instagram.com/p/DAYa_mjpLlB
“लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्याने भाजपाला हद्दपार केले. तोच कित्ता आगामी विधानसभा निवडणुकीत गिरवण्यासाठी शरद पवार यांना पुन्हा जिल्ह्याने ताकद देणे गरजेचे आहे. येथील खासदारांना काही लाखाच्या मताधिक्यांनी नागरिकांनी निवडून दिले. असाच पुढील उमेदवार तुतारीसाठी निवडून द्यावा.”
https://www.instagram.com/p/DAX_Si_Jcu7
आगामी विधानसभा निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे जसे खासदारांना विजयी करण्यासाठी सगळे लढले.
तसेच तुतारीचा आमदार करण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणावा,
अशी त्यांनी गळ घातली. त्यामुळे सिन्नर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडे राहील असे संकेत त्यांनी दिले. (Maharashtra Politics News)
https://www.instagram.com/p/DAXwbm4CDuZ
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’