Maharashtra Politics News | भाजपचा बडा नेता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत; भाजपला मोठा धक्का?

uddhav-thackeray-devendra-fadnavis

रत्नागिरी: Maharashtra Politics News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पक्षातील इन्कमिंग आणि आऊटगोईंग होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आता भाजपचा एक बडा नेता शिवसेना ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या माजी आमदाराने आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यासोबत ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

https://www.instagram.com/p/DAakqy-pzoW

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून (Ratnagiri Assembly Constituency) हे माजी आमदार लढण्यासाठी इच्छुक आहेत. रत्नागिरी मतदारसंघातून सध्या मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे आमदार आहेत. जागावाटपात विद्यमान आमदारांच्या सूत्रानुसार ती जागा संबंधित पक्षाकडेच राहणार आहेत. त्यामुळे भाजपच्या माजी आमदाराने ठाकरे गटाशी जवळीकता वाढवली आहे.

https://www.instagram.com/p/DAaict_pNv7

भाजपचे माजी आमदार बाळ माने (BJP Former MLA Bal Mane) हे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रत्नागिरीत सुरू आहे. माने दसऱ्यानंतर सीमोल्लंघन करणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी माने यांनी साडू आणि आमदार भास्कर जाधव यांच्याबरोबर ‘मातोश्री’वर गेले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

https://www.instagram.com/p/DAahR6gttQh

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांच्या उमेदवारी शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे माजी आमदार बाळ माने यांना तिकीट मिळणार नसल्याची खात्री पटली आहे. म्हणून माने यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

https://www.instagram.com/p/DAaffo0pGIj

परंतु, बाळ माने यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, माने यांच्या प्रवेशानंतर कोकणात ठाकरे गटाला बळ मिळणार आहे. तसेच, भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

https://www.instagram.com/p/DAadzAjJuiV

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’