Maharashtra Politics News | ‘भाजपाने शिवसेना- मनसेत भांडण लावलेत’; काँग्रेस नेत्याची टीका म्हणाले – “राज ठाकरे गोंधळलेले नेते”

Uddhav Thackeray-Raj Thackeray

मुंबई : Maharashtra Politics News | लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरणार असे चित्र स्पष्ट होत आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) घेतलेल्या भूमिकेवरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका होत असताना बीड दौऱ्यावेळी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. यामध्ये ठाकरे गटाचे (Shivsena UBT) कार्यकर्ते, पदाधिकारी असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.

यानंतर ठाण्यातील सभेला जात असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यावर नारळ, बांगड्या आणि शेण फेकून मनसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून राज ठाकरे गोंधळलेले नेते आहेत अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, राज ठाकरे गोंधळलेले नेते आहेत. मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी ठाकरे शिवसेना- मनसे (Shivsena UBT-MNS) पक्षात भाजपाने भांडण लावले आहे. ठाण्यात झालेली ही घटना दुर्दैवी आहे. दोन पक्षात भांडण लावून मतांची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

महाराष्ट्रात वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे हे राज्य आहे, असे सांगत, परमबीर सिंह यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी भाजपाचा सहारा घेतला. ते भाजपाच्या इशाऱ्यावर बोलतात, हे काही लपून राहिलेले नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics News)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांना बंड करायची आवश्यकता काय होती.
ईडी, सीबीआयचा दबाव त्यांच्यावर होता हे नक्की, असे म्हणत कुठे काही झाले तरी शरद पवारांचे नाव घेतले जाते.
मनोज जरांगे यांची अलीकडील विधाने पाहिली तर, त्यांनी शरद पवारांवरही भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरे कोणत्याही वादात दिसत नाहीत, असे विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

You may have missed