Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत’, काँग्रेस नेत्याचे मोठे विधान; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे…’
अमरावती: Maharashtra Politics News | महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) युवा मेळाव्याचे आयोजन रविवार (दि.२०) अमरावती येथे करण्यात आले होते. यावेळी बोलताना काँग्रेसच्या नेत्या, आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मोठे विधान केले आहे. “पुढच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावं” असं यशोमती ठाकूर यांनी म्हंटलं आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या (Mahayuti) मित्र पक्षात मुख्यमंत्री पदावरून मतभेद असताना यशोमती ठाकूर यांनी केलेले विधान राजकीय वर्तुळात चर्चेचे ठरत आहे.
कार्यक्रमात बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, ” प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपले गाव-आपला बूथ सक्षमपणे सांभाळावा. विजय आपलाच असला तरी ही लढाई मोठी असल्याने कुणीही गाफील राहू नये. देश विघातकी शक्तीच्या विरोधात पुन्हा पेटून उठण्याची वेळ आली आहे.
विरोधक विधानसभा निवडणुकीत नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी लाखों खर्च करून मोठ-मोठे होर्डिंग लावून सरकारचे गोडवे गात असले तरी निवडणूक जिंकण्यासाठी भाजप मित्र पक्षांकडून उधळला जात असलेला हा पैसा जनतेच्या घामाचा पैसा आहे.
याची जाणीव त्यांना करून देण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी सर्व भेद विसरून एकजुटीने काम करावे”, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या, ” जो ५० कोटी घेऊन स्वतःच्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसतो तो जनतेचा काय होणार. आताच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं. उद्धव ठाकरेंनी का नाही मुख्यमंत्री व्हायला हवं. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले. ते तुम्हाला सहन नाही झालं तर काय होणार.
माझ्या मनातली इच्छा सांगते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे पूर्ण करायला हवी होती. माझं वैयक्तिक मत आहे की, पुढच्या काळात त्यांनीच त्या ठिकाणी विराजमान व्हावं. आम्ही तुमच्या सोबत आहोत”,असे यशोमती ठाकूर यांनी म्हंटले आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट? अमित शहांना राऊतांचा फोन?
या चर्चेवर काँग्रेसचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न’
Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?