Maharashtra Politics News | एकाच मतदारसंघात भाजपचे अनेकजण इच्छुक; उमेदवार बदलण्याचा धोका भाजप पत्करणार? डोकेदुखी वाढली

BJP

पुणे: Maharashtra Politics News | राज्यात मागील काही काळात दोन पक्षात बंड झाल्याने आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) एकाच मतदारसंघात अनेकजण इच्छुक असल्याचे चित्र आहे. तर पर्वती विधानसभा मतदारसंघात (Parvati Assembly Constituency) भाजपकडून इच्छुक वाढले आहेत. या मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) विद्यमान आमदार आहेत.

https://www.instagram.com/p/DAakqy-pzoW

माधुरी मिसाळ यांच्यासह महापालिकेतील माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale), माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर (Rajendra Shilimkar) हे प्रमुख दावेदार मानले जात आहे. तसेच भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांचे देखील नाव सातत्याने पुढे येत आहे. भिमाले यांनी जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. मतदार नोंदणी अभियान, भाजप सदस्य नोंदणी आदी कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले.

https://www.instagram.com/p/DAaYoyTJ4-S

रिक्षा चालकांना गणवेश वाटप, महिलांना पैठणी साडी वाटप आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. शहराध्यक्ष घाटे यांचा प्रभागातील काही भाग हा कसबा मतदारसंघात (Kasba Assembly Constituency) आणि काही भाग हा पर्वती मतदारसंघात येतो. यामुळे घाटे यांच्याकडे या दोन्ही मतदारसंघाचा पर्याय उपलब्ध आहे.

https://www.instagram.com/p/DAaW8DWpNr6

मात्र २००९ पासून सलग तीनवेळा या मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ निवडून येत आहे. त्यांच्या उमेदवारीविषयी साशंकता निर्माण केली जात असली तरी या ठिकाणी उमेदवार बदलण्याचा धोका भाजप पत्करणार का? हा उत्सुकतेचा विषय आहे.

https://www.instagram.com/p/DAaVNfgJ3Az

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed