Maharashtra Politics News | माजी मंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर, भाजपला करणार रामराम; विधानसभा लढवण्याची व्यक्त केली इच्छा
नंदुरबार: Maharashtra Politics News | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) चर्चा सुरु आहे. इच्छुक उमेदवार ज्या पक्षातून उमेदवारी मिळेल अशा पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. (Maharashtra Politics News)
https://www.instagram.com/p/DAgQsNZCg7H
अशातच आता काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून (Congress) भाजपात (BJP) गेलेले माजी मंत्री पद्माकर वळवी (Padmakar Valvi) आता पुन्हा पक्ष बदलण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने त्यांनी प्रयत्न सुरु केलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar Politics News) पद्माकर वळवी यांची आदिवासी चेहरा म्हणून ओळख आहे. वळवी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
https://www.instagram.com/p/DAf3hZXCY4k
परंतु एखाद्या पक्षाने मला तिकीट दिले तर मी त्या पक्षातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत पद्माकर वळवी यांनी दिले आहेत. मला चांगली संधी मिळाली तर त्या संधीचा मी फायदा घेणार. यामुळे पद्माकर वळवी हे पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.
https://www.instagram.com/p/DAftoa6ijMf
गेल्या अनेक दिवसापासून पद्माकर वळवी हे मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. अशातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शहादा- तळोदा मतदार संघ (Shahada Taloda Assembly Constituency) किंवा अक्कलकुवा- अक्राणी या मतदार संघातून (Akkalkuwa Assembly Constituency) लढण्याची इच्छा पद्माकर वळवी यांनी व्यक्त केली आहे. मात्र येणाऱ्या काळात कोणता पक्ष वळवी याना तिकीट देणार त्यानुसार पुढचे राजकीय समीकरण असणार आहे.
https://www.instagram.com/p/DAfq_C9Cqh0
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)