Maharashtra Politics News | राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना शिंदेंचा नेता स्पष्टच बोलला, “जर देवेंद्र फडणवीसांनी त्याग…”
मुंबई : Maharashtra Politics News | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता महायुतीमधूनच (Mahayuti) मुख्यमंत्री पदासाठी कोणता चेहरा पुढे येणार त्याबाबत उत्सुकता आहे. निवडणुकीपूर्वीच महायुतीतून मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चढाओढ सुरु होती. मात्र प्रचारादरम्यान ही चर्चा महायुतीच्या नेत्यांनी टाळली होती. आता निकाल हाती आल्यानंतर त्या-त्या पक्षाचे नेते आपला नेता मुख्यमंत्री असावा अशी मागणी करताना दिसत आहेत. (Who Will Be CM Of Maharashtra)
विधानसभा निवडणुकीत भाजपचा (BJP) १४८ जागांपैकी १३२ जागांवर, शिंदे गटाचा (Shivsena Shinde Group) ८५ जागांपैकी ५७ जागांवर तर अजित पवार गटाचा (Ajit Pawar NCP) ५१ जागांपैकी ४१ जागांवर विजय झाला आहे. सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी यावर भाष्य केलं आहे.
प्रताप सरनाईक म्हणाले, ” मला जर पक्षाचा आमदार म्हणून किंवा शिंदेचा ३० वर्षांचा सहकारी म्हणून विचारत असाल तर आम्ही दोघांनी महापालिकेत एकत्रित नगरसेवक म्हणून काम केलं. आज ते पाचव्यांदा आणि मी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो आहे. सर्वात जास्त मताधिक्याने आम्ही निवडून आलो आहोत.
मला सर्वात जास्त १ लाख ८५ हजारांचं मताधिक्य मिळालं आहे. या सर्व बाबींचा विचार करता ज्या चेहऱ्याच्या आधारे इतकं भरभरुन मतदान झालं ते पाहता तो चेहरा मुख्यमंत्रीपदी असावं असं आम्हाला वाटतं. शेवटी निर्णय वरिष्ठांचा आहे. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शहा (Amit Shah) जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक आहे.”
ते पुढे म्हणाले, ” भाजपाच्या आमदारांना विचारलं तर ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना मुख्यमंत्री करा असं सांगतील. त्याप्रमाणे आम्हालाही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं.
राजकारणात त्याग करावाच लागतो. जनतेला चांगल्या गोष्टी द्यायच्या असतील त्यासाठी त्याग करावा लागतो.
जर देवेंद्र फडणवीस यांनी त्याग केला नसता, तर आज हे दिवस दिसले असते का? आजचे अच्छे दिन हे त्या त्यागाचं प्रतीक आहे.
भविष्य उज्वल असतं. मला जो एकनाथ शिंदेंचा इतिहास माहिती आहे त्यानुसार त्यागाचं खरं प्रतिक आणि दुसरं नाव एकनाथ शिंदे आहे”,
असे सरनाईक यांनी म्हंटले आहे. (Maharashtra Politics News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट