Maharashtra Politics News | शिंदेंच्या शिवसेनेचे दोन उमेदवार एबी फॉर्म घेऊन नॉट रिचेबल; महायुतीचं टेन्शन वाढलं

Ajit-Pawar-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis

नाशिक: Maharashtra Politics News | बंड शमविण्‍यासाठी वरिष्‍ठ नेत्‍यांनी ‘समजूत मोहीम’ हाती घेतली असली, तरी जिल्‍ह्यात अद्याप उमेदवारी मागे घेण्‍याचा शब्‍द कोणत्‍याही बंडखोर उमेदवाराने दिलेला नाही. अनेक बंडखोर उमेदवारांकडे राजकीय पक्षांच्‍या बड्या नेत्‍यांनी समझोता करण्‍यासाठी काही दूत पाठविले होते, पण हे प्रयत्‍न देखील अपुरे पडत असल्‍याचे चित्र आहे. आज (दि.४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

दरम्यान, महायुतीत (Mahayuti) काही मतदारसंघांमध्ये गोंधळ सुरू असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार (Ajit Pawar NCP) असलेल्या काही मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shivsena Shinde Group) एबी फॉर्म दिले आहेत. अशातच नाशिकमधील देवळाली (Deolali Assembly Constituency) आणि दिंडोरी (Dindori Assembly Constituency) या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी एबी फॉर्म दिलेले दोन्ही उमेदवार कालपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

दिंडोरी येथील शिवसेना शिंदे गटाकडून एबी फॉर्म मिळालेले धनराज महाले (Dhanraj Mahale) आणि देवळालीतील राजश्री अहिरराव (Rajshree Ahirrao) या कालपासून नॉट रिचेबल आहेत. दिंडोरीत राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) तर देवळालीतून सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना तिकीट देण्यात आले आहे.

मात्र असं असतानाही एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी दिंडोरीतून धनराज महाले आणि देवळालीतून राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म दिले होते. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी म्हणजे आज हा तिढा सुटून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार माघार घेतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता हे उमेदवारच नॉट रिचेबल झाल्याने महायुतीचे टेन्शन वाढलं आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | ‘उमेदवार द्यायचा नाही आता कोणाला पाडायचं ते पाडा’, मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले – ‘गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू’

Pune Politics News | इच्छुकांची नाराजी दूर झाली पण त्यांच्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते अद्याप संतप्तच?

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…

You may have missed