Maharashtra Politics | शायना एनसी प्रकरणी शरद पवारांकडून अरविंद सावंत यांची पाठराखण; म्हणाले – ‘अरविंद सावंत यांचं वक्तव्य वैयक्तिक हल्ला होत नाही’
पुणे: Maharashtra Politics | शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी महायुतीच्या उमेदवार (Mahayuti Candidate) सायना एनसी (Shaina NC) यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. शायना एनसी यांनी तक्रार केल्यानंतर अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणावर पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारलं असता त्यांनी अरविंद सावंत यांची पाठराखण केली आहे.
दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया विचारली. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “अरविंद सावंत यांचं वक्तव्य हा व्यक्तिगत हल्ला होत नाही, असं दिसते. मात्र महिलांबाबत बोलताना काळजी घेतली पाहिजे,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबादेवी मतदारसंघातून (Mumbadevi Assembly Election 2024) काँग्रेसच्या अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मतदारसंघात गेले होते. शायना एन. सी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून (Worli Assembly Constituency) निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.
याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.” अरविंद सावंत यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडलं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा