Maharashtra State Examination Council | पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांच्या नावे खोटे प्रमाणपत्र, शिक्षक भरतीसाठी वापर?
पुणे : Maharashtra State Examination Council | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र (Fake Documents) तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेसह तीन जणांवर डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फसवणुकीचा (Cheating Fraud Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 19 जून 2024 रोजी दुपारी तीन ते चार या दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात घडला. (Fake Certificate)
याबाबत परीक्षा परीक्षेचे उपायुक्त संजयकुमार धर्मा राठोड (वय-48 रा. विजापुर रोड, सोलापूर सध्या रा. शिक्षक भवन, नवी पेठ, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अश्विनी संतोष शिंदे/अश्विनी कैलास गवते (वय-33 रा. साकुर, ता. संगमनेर जि. अहमदनगर), सहदेव निंभोरे (रा. साकु, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), निलेश राठोड यांच्यावर आयपीसी 420, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अश्वीनी शिंदे या महिलेने परीक्षा परिषदेच्या उपायुक्त कार्यालयात समक्ष येवुन प्रमाणपत्र सादर केले. तपासणीत प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. प्रमाणपत्रावर बनावट शिक्का, तसेच राठोड यांनी बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर फिर्यादी यांनी संबंधित महिलेला चौकशीसाठी बोलावले. चौकशीत आरोपी सहदेव निंभोरे, निलेश राठोड यांनी प्रमाणपत्र दिल्याचे महिलेने सांगितले. आरोपींनी शासनाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिलेसह निंभोरे, राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. (Maharashtra State Examination Council)
आरोपींनी बनावट प्रमाणपत्र तयार का केले? प्रमाणपत्राचा वापर शिक्षक भरतीत करण्यात येणार होता का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड
Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा