Maharashtra Sugar Factory | राज्यातील 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा; साखर आयुक्त यांचा निर्णय

मुंबई :– Maharashtra Sugar Factory | महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरलेल्या मुदतीत एफआरपी (योग्य आणि किफायतशीर किंमत) रक्कम न दिल्यामुळे साखर आयुक्तालयाने (Sugar Commissionerate) राज्यातील १५ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस बजावली. संबंधित कारखान्यांकडून २४६ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
साखर आयुक्तालयाने बजावलेल्या नोटीशीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १०, अहमदनगर जिल्ह्यातील २, सातारा जिल्ह्यातील २ आणि छत्रपती संभाजीनगरमधील १ अशा एकूण १५ साखर कारखान्यांचा समावेश आहे. एफआरपी थकवणे हे कायद्यानुसार शिक्षेस पात्र आहे. याबाबत महसूल वसूलीचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, साखर आयुक्तालयाने आरआरसी नोटीस बजावल्यानंतर, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जप्तीची कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. जर संबंधित कारखान्यांनी दिलेल्या मुदतीत थकबाकी भरली नाही, तर जिल्हाधिकारी जप्तीची कारवाई करणार आहेत.
थकबाकीदार साखर कारखाने…
१. सोलापूर जिल्हा
- मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट
- गोकुळ शुगर्स लि., धोत्री
- लोकमंगल अॅग्रो इंड. लि., बिबी दारफळ
- लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को-जनरेशन
- भिमाशंकर शुगर मिल्स लि., पारगाव
- जयहिंद शुगर्स प्रा. लि., आचेगाव
- श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा
- सिद्धनाथ शुगर मिल्स लि., उत्तर सोलापूर
- इंद्रेश्वर शुगर मिल्स प्रा. लि.
- धाराशिव शुगर लि., सांगोला
२. अहमदनगर जिल्हा
- स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंड. लि., नेवासा
- श्री गजानन महाराज शुगर, संगमनेर
३. सातारा जिल्हा
- खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना
- किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना
४. छत्रपती संभाजीनगर
- सचिन घायाळ शुगर्स प्रा. लि., पैठण