Maharashtra Swarajya Party | संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला पक्ष म्हणून मान्यता, चिन्हही ठरलं; युती, आघाड्यांचे टेन्शन वाढणार?

मुंबई : Maharashtra Swarajya Party | संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य संघटनेला भारतीय निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. हा पक्ष आता ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावाने निवडणुकीत उतरणार आहे.
https://www.instagram.com/p/DAkk8drJ6Sr
संभाजीराजेंच्या या पक्षाला मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळेल असे बोलले जात आहे. राज्यात सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात संभाजीराजे त्याचा फायदा त्यांना विधानसभेत होऊ शकतो. दरम्यान युती (Mahayuti) आणि आघाड्यांचे (Mahavikas Aghadi) टेन्शन वाढल्याचं चित्र आहे.
https://www.instagram.com/p/DAkdEHzJUMQ
नवीन पक्षाला मान्यता मिळाल्यानंतर संभाजीराजेंनी याबाबत माहिती दिली आहे. ९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली ‘स्वराज्य संघटना’ आता भारतीय निवडणूक आयोगाकडे ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे.
https://www.instagram.com/p/DAkal4qJcHk
अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे चिन्ह मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.
https://www.instagram.com/p/DAke8lGCF0i
ते पुढे म्हणाले, मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवली आहे. आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे.
https://www.instagram.com/p/DAjErLWCf33
महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट,
राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता
ही आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत,
परिवर्तन महाशक्तीस (Maharashtra Parivartan Mahashakti) सत्तास्थानी घेऊन जाईल, असे त्यांनी म्हंटले. (Maharashtra Swarajya Party)
https://www.instagram.com/p/DAjB7M1ijQd
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)