Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रावर हवामानाचे दुहेरी संकट: एकाच वेळी अवकाळी पाऊस अन् उष्माघाताचा इशारा

Maharashtra Weather

मुंबई : Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात सध्या हवामानाचे विचित्र आणि परस्परविरोधी स्वरूप पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात सक्रिय झालेल्या ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे राज्याच्या वातावरणात मोठी उलथापालथ झाली असून, एका बाजूला कडाक्याचे ऊन आणि दुसऱ्या बाजूला पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. यामुळे काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, राज्याच्या उर्वरित भागात सूर्याचा तडाखा वाढला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर पोहोचला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा अधिकच जाणवत असून, नागरिक या दुहेरी हवामान बदलामुळे हैराण झाले आहेत.

You may have missed