Maharashtra Weather News | येत्या दोन दिवसात राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

thandi

पुणे: Maharashtra Weather News | गेल्या १५ दिवसांपासून गायब झालेली थंडी काल शुक्रवार पासून (दि.३) पुन्हा जाणवू लागली आहे. राज्यातील काही भागात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. राज्यात काही ठिकाणी तापमान १० अंशावर आले असून, पुण्यात ११.७ अंश नोंदले गेले. येत्या दोन दिवसात राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला. (Pune Weather News)

राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदियात ८.८ अंशावर नोंदले गेले.राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात सकाळपासून थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. सध्या उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कमी जास्त होत आहे.

दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी कमाल तापमान कायम दिसत असून, उत्तर भारतातील तापमानात घट होऊ शकते. राज्यामध्ये काही ठिकाणी सकाळी धुक्याची चादर पहायला मिळत आहे. तसेच शुक्रवारी दुपारी उन्हाचा कडाका जाणवत होता. राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात आणखी ३ ते ४ अंश सेल्सिअसची घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील किमान तापमान:- पुणे-११.७, नगर-१०.४, कोल्हापूर-१६.५, महाबळेश्वर-१२.८, नाशिक-११.३, सातारा- १४.६, मुंबई-२१.५, धाराशिव-१३.०, बीड-१०.९, नागपूर-९.०, गोंदिया- ८.८ (Maharashtra Weather News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune PMC News | नगरसेवक नसल्याने पुणे महापालिकेचा ‘स्वैर’ कारभार !
पर्यावरण पूरक प्रकल्प राबविणार्‍यां मिळकत धारकांमागेच प्रशासनाचा ‘तगादा’

Katraj Pune Crime News | पुणे: आमच्या आधी मटण का खाल्लं?, असा सवाल करत मित्राने फावड्याच्या दांडक्याने केली मारहाण

Pune Police MPDA Action | धडाकेबाज ! अवघ्या 11 महिन्यात MPDA कारवाईचे शतक;
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 103 अट्टल गुन्हेगारांना केले स्थानबद्ध