Maharashtra Weather Update | गणरायासोबत पावसाचंही होणार आगमन; हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

Pune Rains

पुणे: Maharashtra Weather Update | आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. दरम्यान सगळीकडेच उत्साहाचे आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गणरायासोबत रिमझिम पावसाने देखील हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुण्यासह मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. (Pune Rains)

हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

नाशिक आणि कोल्हापूमध्ये देखील चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडसह काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले आहे. त्यामुळे पुणे शहर, घाटमाथ्यासह जिल्ह्याला पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना हवामान विभागातर्फे
पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या जिल्ह्यांना
ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग,
रत्नागिरी या जिल्ह्यांना ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर राज्यातील बहुतांश भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड आणि सातारा जिल्ह्याला, तसेच संपूर्ण विदर्भाला ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी
करण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला ८ आणि ९ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. निवृत्त हवामान विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed