Maharashtra Weather Update | महाराष्ट्राला पुन्हा चक्रीवादळाचा धोका? ‘या’ 8 जिल्ह्यांवर असणार गारपिटीचे संकट, आजचे हवामान कसे असेल..

मुंबई ः Maharashtra Weather Update | उष्णतेच्या लाटांमध्ये थोडीशी घट झाली असली, तरी राजस्थानच्या अनेक भागामध्ये ती कायम राहिली. त्याचबरोबर गुजरात, दक्षिण हरियाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेशातील काही भागात देखील उष्णतेचे चटके जाणवले. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात उष्ण हवेची स्थिती राहिली आहे.
महाराष्ट्रात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये गारपिटीचे संकट आहे. पुढचे तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यात ४०-५० किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लातूर, धाराशीव जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून (India Meteorological Department) व्यक्त करण्यात आला आहे.
अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, विजांच्या कडकडाटामुळे वीज पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी, वाहनचालक आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. हवामान खात्याच्या मते, पुढील २४ तासांत ही प्रणाली आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. तथापि, त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या काही भागात जाणवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुजरातच्या सौराष्ट्र भागात सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, मध्य महाराष्ट्रात तापमान ४२ ते ४४ अंशांच्या दरम्यान होते. मात्र, पुढील तीन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.