Maharashtra Weather Update | थंडी नाही, आता पावसाचीच चाहूल! 10 नोव्हेंबरपर्यंत छत्री जवळ ठेवा, हवामानाचा नेमका अंदाज काय?

rains

मुंबई ः पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Weather Update | नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे कापणी झालेल्या पिकांचे किंवा कापणीच्या वेळी येणाऱ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे थंडी लांबली आहे, तर ढगाळ वातावरणामुळे लोकांना घाम फुटू लागला आहे. अवकाळी पाऊस १० नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. त्यानंतर मात्र पावसाची तीव्रता कमी होईल.

वायव्य दिशेकडून चक्राकार वारे येत आहेत. ज्याचा परिणाम ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी होईल. कोकण आणि गोवा किनाऱ्यावर पावसाची नोंद झाली आहे. म्यानमार जवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते पश्चिम बंगालच्या उपसागरात असल्याने वारे भारताकडे जातात का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुजरात किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

आज महाराष्ट्रात हलका पाऊस पडेल. तथापि, आज महाराष्ट्रालगतच्या राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडेल. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

कोकण भागातील मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा भागात मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता आहे. पुण्यातील कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

You may have missed