Mahavikas Aghadi News | मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबाबत मविआतील उच्चपदस्थ नेत्यांच्या सूचना; म्हणाले,…
मुंबई: Mahavikas Aghadi News | महाविकास आघाडीतून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. तिन्ही पक्षातील उच्चपदस्थ नेत्यांनी पदाधिकारी, नेत्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेते अथवा पदाधिकारी यापुढे मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल (MVA Face Of CM) कुठेही सार्वजनिक रित्या वक्तव्य करणार नाहीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री पदावरून दावे-प्रतिदावे आणि त्यावरून विनाकारण होणारा संभाव्य विवाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्त सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
https://www.instagram.com/p/DAdLeMDi9Se
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपा (MVA Seat Sharing Formula) पेक्षा मुख्यमंत्री कोण यावर चांगलेच वाक युद्ध रंगल्याचे बघायला मिळाले आहे. पक्षातील नेते आपल्या नेतृत्वाबाबत मुख्यमंत्री म्हणून दावे करीत आहेत. अनेक ठिकाणी त्या आशयाचे बॅनर देखील लागल्याचे बघायला मिळाले होते.
https://www.instagram.com/p/DAdIfXjJ8ks
मात्र, याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये वाद होण्याची शक्यता बळावली आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल मविआतील उच्चपदस्थ नेत्यांनी महत्वाच्या सूचना तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/DAdGu1YNvV3
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)