Mahavikas Aghadi On Maratha-OBC Reservation | आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा ‘मविआ’चा निर्णय; जाणून घ्या

मुंबई: Mahavikas Aghadi On Maratha-OBC Reservation | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी सायंकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण या बैठकीत विरोधकांनी बहिष्कार घातल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले.
विधानपरिषदेतही अनिब परब (Anil Parab) यांनी आधीच्या बैठकांना बोलावले नाही या बैठकीत काय तोडगा काढणार? असे म्हंटले. राज्यसरकारने विरोधकांना विश्वासात न घेतल्याने महाविकास आघाडी बैठकीला न जाता, राज्यशासनाने आरक्षणप्रश्नी भूमिका सभागृहात स्पष्ट करावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.
राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन सुरु असताना आंदोलकांसोबत केलेली चर्चा, दिलेले आश्वासन शासनाने सभागृहात मांडावे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काय चर्चा केली होती ती राज्यातल्या जनतेला कळली पाहिजे. आरक्षण प्रश्नी सरकारने दोन्ही समाजाचे समाधान व्हावे असा तोडगा काढावा, सरकारने न्याय देण्याची भूमिका घ्यावी असे महाविकास आघाडीने म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…