Mahavikas Aghadi | ‘एमआयएम’चा महाविकास आघाडीत समावेश होणार?; माजी खासदार इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य

Imtiaz Jaleel

छ. संभाजीनगर : Mahavikas Aghadi | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टीने मविआ मध्ये जागावाटपावर चर्चा सुरु आहे. एकत्र लढण्याबाबत एकमत झालेले असले तरी कोणती जागा कोण लढणार यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. दरम्यान एमआयएएमने (MIM) महाविकास आघाडीसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

इंडिया आघाडीसोबत (India Aghadi) जाण्याची एमआयएएमची इच्छा आहे. तुम्ही आम्हाला घ्यायला तयार असाल तर इतक्या जागा आम्ही एमआयएमला देऊ शकतो ते सांगावे. तुम्ही उद्या मुंबईत बोलवा. महाराष्ट्राबाबत सर्व निर्णय असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी माझ्यावर सोडलेले आहेत. आपण एका बैठकीत सर्व निश्चित करू , असे विधान एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेले आहे.

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, मविआ नेत्यांकडून याआधी अनेकदा एमआयएम ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. आम्हाला सोबत घेतलं तर तुमचा फायदा होईल नाही घेतले तर एमआयएममुळे फटका बसला असा आरोप करू नका.

महाविकास आघाडी एमआयएमला किती जागा सोडणार हे सांगावे. आमची इंडिया आघाडी सोबत येण्याची इच्छा आहे.
तुम्ही फक्त आम्हाला किती जागा देणार ते सांगा असे जलील यांनी सांगितले. (Mahavikas Aghadi)

तसेच शरद पवार, काँग्रेस आणि नव्याने सेक्युलर झालेली उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सेना यांनी विचार करायला हवा.
एमआयएमला मानणाराही एक मोठा वर्ग आहे. आम्हाला जर सोबत घेतले तर तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो.
तुम्ही आम्हाला जितक्या जागा द्याल तिथे नक्कीच आम्हाला फायदा होणार पण त्याच्या कित्येक पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे
याचाही विचार करावा, असंही माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडे पुण्यातील 8 मतदारसंघातून 24 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसची महत्वकांक्षा वाढली

ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर

Maharashtra DCP / SP Transfers | शिरीष सरदेशपांडे यांची पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी नियुक्ती; राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या बदल्या

You may have missed