Mahayuti Contact With Bachchu Kadu | बच्चू कडूंना मविआसह महायुतीकडूनही संपर्क, बच्चू कडू काय भूमिका घेणार? उत्सुकता शिगेला
मुंबई: Mahayuti Contact With Bachchu Kadu | विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान (दि.२०) रोजी पार पडल्यानंतर आता निवडणुकीचा निकाल उद्या (दि.२३) जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात नेमकं कोणाचं सरकार येणार? महाविकास आघाडी की महायुती बाजी मारणार? याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान निकालानंतर सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अपक्षांसह इतर छोट्या पक्षांना संपर्क साधला जात आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून मतदारांसमोर तिसरा पर्याय ठेवणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना महायुतीसह महाविकास आघाडीनेही संपर्क केल्याची माहिती आहे. त्यामुळे बच्चू कडू हे नक्की कोणाच्या बाजूने जाणार, याबाबतची उत्सुकता आहे.
महायुती सरकारमध्ये बच्चू कडू सहभागी होते. त्यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान त्यांनी महायुती पासून दूर जात परिवर्तन महाशक्तीच्या रुपाने तिसरी आघाडी निर्माण केली.
या आघाडीला महाराष्ट्रात १५ जागा मिळतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीने बच्चू कडू यांना संपर्क साधत त्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
बच्चू कडू म्हणाले, “आमच्या प्रहारचे किमान १० आमदार निवडून येतील. महाशक्ती परिवर्तन आघाडी मिळून १५ आमदार होतील. कोणत्याही आघाडीची सत्ता येईल, अशी आकडेवारी जुळत नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत. हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. बाकीच्यांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. लहान पक्ष आणि अपक्ष, अशी आघाडी झाल्यानंतर मग सत्तेचं स्वरूप आणि दिशा बदलेल.”
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा