Mahayuti Govt | राज्यसरकारचा सीमा भिंतीचा निधी भाजप आमदारांच्या मतदारसंघातच; काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार असलेले मतदारसंघ वगळले
पुणे : Mahayuti Govt | नाल्यांना सीमा भिंत बांधण्यासाठी (Funding Of Border Wall) राज्य सरकारने महापालिकेला २०० कोटी रुपये दिले आहेत. मात्र यातून संपूर्ण शहराचा विचार न करता केवळ भाजपचे आमदार (BJP MLA) असलेल्या पाच विधानसभा मतदारसंघातच हा निधी वाटप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP MLA) आणि काँग्रेसचे आमदार (Congress MLA) असलेल्या मतदार संघात एक रुपयाही निधी देण्यात आलेला नाही.
२०१९ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Pune Rains) आंबिल ओढ्याला पूर येऊन अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते. यामध्ये सोसायट्यांच्या सीमा भिंती पडून नुकसान झाले. नाल्यांना येणार पूर रोखण्यासाठी सीमा भिंत बांधणे आवश्यक असल्याने महापालिकेने काही ठिकाणी भिंत बांधली, पूल बांधले पण, इतर भागात तांत्रिक कारणामुळे काम करता आलेले नाही.
राज्य सरकारने यासाठी महापालिकेला (Pune Municipal Corporation – PMC) २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यानुसार मलनिःसारण विभागाने ५ निविदा काढलेल्या आहेत. या निविदांमध्ये नियमांचे पालन करण्यात आलेले नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने (Pune Collector Office) हरकत घेतली होती. त्यानंतर आता सुधारणा करून दुसरा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघात नाले असून, मुसळधार पावसामुळे सर्वच भागात पूरस्थिती निर्माण होत आहे. पण महापालिका प्रशासनाने भाजपचे आमदार असलेल्या आमदारांच्याच मतदारसंघातील यादी राज्य सरकारकडून मंजूर करून आणली आहे.
यामध्ये खडकवासला मतदारसंघासाठी (Khadakwasla Assembly Constituency) ४१.२३ कोटी, शिवाजीनगर मतदारसंघासाठी (Shivaji Nagar Assembly Constituency) २४.८० कोटी, कॅन्टोन्मेंटसाठी (Pune Cantonment Assembly Constituency) ३९.०४ कोटी, पर्वतीसाठी (Parvati Assembly Constituency) ४१.१५ कोटी आणि कोथरूडसाठी (Kothrud Assembly Constituency) १९.९० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या वडगाव शेरी (Vadgaon Sheri Assembly Constituency),
हडपसर (Hadapsar Assembly Constituency) आणि काँग्रेसचे आमदार असलेल्या कसबा मतदारसंघाचा (Kasba Assembly Constituency)
यामध्ये समावेश नसल्याने या भागात नाल्यांना सीमा भिंत बांधण्यात येणार नाही.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही आमदार सत्ताधारी महायुतीमध्ये असूनही त्यांना डावलण्यात आलेले आहे.
” नाल्यांसाठी २०० कोटीचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्याला प्रशासकीय मान्यता ही जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली आहे.
राज्य सरकारने पाच मतदारसंघातील कामांची यादी महापालिकेला दिली आहे, त्यानुसार कामे केली जाणार आहेत “,
असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale) यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद