Mahayuti News | राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंघ ठेवण्यावर केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न; नेत्यांना दिले निर्देश

मुंबई: Mahayuti News | महायुतीमधील मित्रपक्षातील नेत्यांकडूनच अजित पवारांना लक्ष्य केले जात असल्याने भाजप- शिवसेनेला आता राष्ट्रवादी नको आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच आता याबाबत महत्वाची अपडेट समोर येत आहे. (Mahayuti News)
आगामी विधानसभेच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला (Ajit Pawar NCP) महायुतीशी एकसंघ ठेवण्यावर केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मनोमिलन करणे भाजप नेतृत्वाचा (BJP Leaders) अजेंडा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध, महायुतीत होणारे वाद आणि अजित पवारांच्या भूमिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महायुती कायम ठेवण्यासाठी आता भर दिला जात आहे. राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंघ ठेवण्यासाठी भाजप सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. याबाबत भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आपल्या आमदारांना सूचना केल्या होत्या.
महायुतीतल्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह
इतर प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा, अधिकाधिक वेळ मतदारसंघात द्या, अंतिम टप्प्यातली कामं मार्गी लावा, अशा सूचना फडणवीसांनी आमदारांना केल्या आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा