Mahayuti News | मुख्यमंत्री शिंदेंकडून स्वपक्षीयांना मंत्रिपदाचा दर्जा, महामंडळांवर नियुक्त्या; राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ; अजित पवारांनी बोलवली बैठक

Ajit-Pawar-Eknath-Shinde

मुंबई : Mahayuti News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून (Eknath Shinde) आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. शिवाय महामंडळांवर नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. सध्या सत्तेत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसेच मंत्रिपदाचे वाटप होत असल्यामुळे आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.

दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar NCP) यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बुधवारी रात्री मुंबईत बैठक बोलावली. अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी बुधवारी (दि.१८) रात्री साडेसात वाजता आमदारांची बैठक पार पडणार आहे. आमदारांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. (Mahayuti News)

राष्ट्रवादीच्या वाट्याला काहीच न आल्याची राजकीय वर्तुळातील चर्चेबाबत बोलताना तटकरे (Sunil Tatkare) यांनी राष्ट्रवादीचा योग्य सन्मान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला देखील महामंडळ येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Assembly Election 2024)

मागील काही दिवसात दिलेल्या नियुक्त्या:

प्रदूषण नियंत्रण बोर्ड अध्यक्ष – सिद्धेश कदम
सिद्धिविनायक न्यासा प्रमुख – सदा सरवणकर
निलम गोऱ्हे – कॅबिनेट पदाचा दर्जा
माजी खासदार हेमंत पाटील – हळद संशोधन केंद्र प्रमूख पदी वर्णी
माजी खासदार आनंदराव अडसूळ- अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती
आदिवासी भागात कुपोषण रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे प्रमूख डॉ. दीपक सावंत यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा
आमदार महेश शिंदे – उपाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळ, कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा
संजय शिरसाट – सिडको अध्यक्ष

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed