Mahayuti Seat Sharing Formula | लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जागावाटपांचा तिढा कायम; महायुतीकडून जागावाटपाची डेडलाईन ठरली; अमित शहा सोडवणार जागेचा तिढा

Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis

मुंबई: Mahayuti Seat Sharing Formula | विधानसभा निवडणुका तोंडावर (Maharashtra Assembly Election 2024) आल्या आहेत. पुढील १५ दिवसात आचारसंहिता लागू होईल, असे भाष्य भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले होते. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होतील, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले होते. (Mahayuti Seat Sharing Formula)

मात्र महायुतीतील तीन पक्षांचा जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. कोण कुठल्या जागा लढणार? किती जागा लढणार? यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र आता महायुतीने आपल्या जागावाटपाबाबतची चर्चा पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतच मुदत निश्चित केली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जागावाटपांचा तिढा कायम आहे. यावर निर्णय घेण्यासाठी आता डेडलाईन ठरवण्यात आली आहे.

सप्टेंबर महिनाअखेर जागावाटपाची चर्चा पूर्ण केली जाणार असून ज्या जागावर तिढा आहे, त्याचा तोडगा अमित शहा यांच्याकडून सोडवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार (Ajit Pawar)-एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)-एकनाथ शिंदे या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत दोन स्वतंत्र बैठका झाल्या आहेत. या बैठकीत ज्या कॉमन जागांवर आग्रह आहे, अशा जागांबाबत चर्चाही झाली.

मात्र, ज्या जागांवर तीनही पक्ष आग्रही आहेत. अशा जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. हा तिढा अमित शहा (Amit Shah) यांच्या मध्यस्थीने सुटणार आहे. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीवेळीही जागावाटपाचा तिढा होता. हा तिढा शहा यांनी सोडवला होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Puja Chavan Death Case | शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून कोर्टात जनहित याचिका

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed