Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित; 25 जागांवर भाजपाचे विशेष लक्ष; संघाच्या आणि भाजपाच्या बैठकांमध्ये रणनीती

मुंबई: Mahayuti Seat Sharing Formula | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) लगबग सुरु आहे. महायुतीत जागावाटपावरून चर्चा सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर (Sagar Bungalow) सोमवारी कोअर कमिटीची बैठक (BJP Core Committee Meeting) पार पडली. येत्या विधानसभेत भाजपा १५० ते १६० जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महायुतीचे जागावाटप ठरण्याची माहिती आहे.
https://www.instagram.com/p/DASsAO_Cbth
महायुतीच्या जागावाटपात विद्यमान आमदारांच्या त्या -त्या पक्षाला जागा देण्यात आल्या आहेत. भाजपाकडे १०५, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांकडे (Ajit Pawar NCP) प्रत्येकी ४० हुन अधिक आमदार आहेत. त्यामुळे या जागा वगळता उर्वरीत जागांसाठी तिन्ही पक्षात चर्चा सुरु आहे. भाजप १५०-१६० जागा लढण्यावर ठाम आहे. तर उर्वरित १३०-१३५ जागा शिंदे गटाला (Shivsena Shinde Group) आणि अजित पवार गटाला दिल्या जाऊ शकतात.
https://www.instagram.com/p/DASoiSwiENg
मागील निवडणुकीत भाजपा १०५ जागा जिंकत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनला होता. मात्र यंदाची निवडणूक भाजपाला सोपी नाही. लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर भाजपाला गेल्यावेळच्या १०५ जागा निवडून आणणंही कठीण आहे.
https://www.instagram.com/p/DASnH29ir7Q/?img_index=1
त्यात जिंकण्याचा विश्वास असलेल्या ८५ जागा वगळता इतर २५ जागांवर भाजपाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी संघाच्या आणि भाजपाच्या बैठकांमध्ये रणनीती आखली जात आहे.
https://www.instagram.com/p/DASjYGBJs3_
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांचे दौरे वाढले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah Maharashtra Tour) दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
त्यात ते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील विविध विभागातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
https://www.instagram.com/p/DASgQ7AC-OH/?img_index=1
त्याशिवाय भाजपाच्या कोअर कमिटीशीही जागावाटप आणि इतर रणनीती यांच्यावर चर्चा करणार आहेत.
भाजपाने ज्या जागा धोक्यात आहेत अशाठिकाणी विशेष लक्ष देण्याचंही ठरवल्याची माहिती आहे. (Mahayuti Seat Sharing Formula)
https://www.instagram.com/p/DASU34rCrpK/?img_index=1
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”