Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीतील तिकीट वाटपाचा अंतिम फार्म्युला ठरणार, बैठकांवर भर; नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात विधानसभा निवडणुक?

मुंबई: Mahayuti Seat Sharing Formula | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून महायुतीने जोरदार तयारी सुरु केली आहे. येत्या २३ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) नागपूर व विदर्भात येत आहेत. २३-२४ रोजी एकीकडे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेसच्या विभागवार बैठका होत असतानाच भाजपमध्येही (BJP) विधानसभा निहाय मतदार संघाचा आढावा घेतला जाणार असून, महायुतीतील तिकीट वाटपाचा अंतिम फार्म्युला ठरणार असल्याची माहिती आहे.
राज्यात १० ते २० नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यात विधानसभा निवडणुका होतील. विजयादशमी नंतर आचारसंहिता लागू होईल,अशी माहिती आहे. म्हणजे पुन्हा एकदा उमेदवारांना १५-१८ दिवसांचाच अत्यल्प कालावधी मिळणार आहे.
या दृष्टीने महायुतीत सातत्याने विधानसभा मतदारसंघात बैठकांवर भर दिला जात आहे. ८० टक्के जागांवर एकमत झाले असून, उर्वरित जागांचा प्रश्न येत्या आठवड्यात निकाली निघेल, अशी माहिती आहे. २८ नोव्हेंबर पूर्वी राज्यात नवे सरकार अस्तित्वात येणार आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीसारखाच अतिशय कमी कालावधी प्रचाराला मिळणार आहे.
महाविकास आघाडी तसेच महायुतीत उमेदवार जाहीर करण्यात कोण आघाडी घेणार यावर बराच खेळ अवलंबून असणार आहे. त्यानंतर इच्छुक उमेदवार या पक्षातून त्या पक्षात गेलेले पाहायला मिळणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलाच्या दृष्टीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या नॅरेटिव्हला चोख प्रत्युत्तर देण्यात महायुती कमी पडली किंबहुना मोदी सरकारच सत्तेत येणार या आत्मविश्वासामुळे आपले नुकसान झाल्याचे वास्तव आता या नेत्यांना कळले असून विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याची योजना आखली जात आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!