Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला? भाजपच मोठा भाऊ, कुणाच्या वाट्याला किती जागा मिळू शकतात?; जाणून घ्या

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar

मुंबई : Mahayuti Seat Sharing Formula | महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांना (Maharashtra Assembly Election 2024) आता काही महिने उरले आहेत. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभेसाठी महायुती तयारीला लागली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचे जागावाटप खूप रखडलेले पाहायला मिळालं. (Mahayuti Seat Distribution)

त्यामुळे उमेदवारांची घोषणा, कोणाला कोणती जागा यात वेळ गेला. त्याचा फटका महायुतीला बसला. मात्र आता जागावाटप लवकर मार्गी लावायचे असे महायुतीने ठरवल्याचे दिसते आहे. त्याबाबत महायुतीतील नेत्यांच्या बैठका होत आहेत.

दरम्यान महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर केला जाईल, जिकंण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती महायुतीच्या बड्या नेत्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena Shinde Group) ७५-८० जागा, अजित पवारांच्या (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादीला ६०-६५ जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपा (BJP) १३०-१३५ जागांवर आणि इतर छोट्या मित्रपक्षांना ३-५ जागा दिल्या जातील.

शिंदे-अजित पवार-फडणवीस यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. विद्यमान आमदार ज्या पक्षांचे आहेत त्यांना तो मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे. यातही काही जागांची अदलाबदल करण्यात येऊ शकते.

मागील निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, भाजपाने १६४ तर शिवसेनेने १२४ जागा लढवल्या होत्या त्यात भाजपाने १०५ आणि शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने १२१ जागा लढवून त्यातील ५४ जागा जिंकल्या होत्या. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे.

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वात ४० हून अधिक आमदार महायुतीत सहभागी झाले
तर अजित पवारांच्या नेतृत्वातही ४० आमदार सत्तेत आले.
त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटपात फेरबदल होतील.

” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्रित बसून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेत आहोत.
निवडून येण्याच्या क्षमतेवर भर देऊन जागावाटप होईल. मतदारसंघात कोणता पक्ष मजबूत आहे याचे निरीक्षण करून जागावाटपाचा निर्णय घेऊ.

मागील निवडणुकीत आम्ही ५४ जागा जिंकलो, ६-७ अपक्ष आमच्यासोबत आहेत त्यामुळे ६० हून अधिक जागा आम्ही नक्कीच घेऊ “,
असे भाष्य अजित पवारांनी जागावाटपावरून केले आहे. (Mahayuti Seat Sharing Formula)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed