Mahayuti Seat Sharing | जागावाटपाची चर्चा रखडल्याने अजित पवार गटात अस्वस्थता; शिंदे गटाइतक्याच जागा मिळण्याची अपेक्षा

Ajit Pawar Mud Off

पुणे : Mahayuti Seat Sharing | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून भाजपच्या कोअर कमिटीची बैठक (BJP Core Committee Meeting) होऊनही महायुतीत जागावाटपाबाबत चर्चा होत नसल्याने अजित पवार गटात (Ajit Pawar NCP) अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागावाटपाबाबत उशीर झाला तर त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. तसेच जागावाटप होत नसल्याने अजित पवार गटातील नेते शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश करू शकतात, अशीही भीती अजित पवार गटाला आहे.

अजित पवार गटाच्या जेष्ठ नेत्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाच्या दृष्टीने जो समन्वय व्हायला पाहिजे होता तो अजूनही दिसत नाही. नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असे गृहीत धरले तरी निदान जागावाटपाची चर्चा तरी लगेच सुरु व्हायला हवी. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी आमचे ट्युनिंग चांगले आहे त्यांनी जागावाटपाबाबत चर्चा करावी अशीही भावना या नेत्याने बोलून दाखवली.

आमच्याकडे जे आमदार आहेत त्यांचे मतदारसंघ आमच्याकडेच राहतील असे गृहित धरून आम्ही काम सुरू केले आहे पण जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करून त्याबाबतची खात्री आम्हाला द्यायला हवी. तसेच, आमदार नसलेले कोणते मतदारसंघ आपल्याला मिळणार हे लगेच स्पष्ट झाले तर त्या मतदारसंघांवर फोकस करणे सोपे जाईल, अशी भावनाही या ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली.

आपल्या गटाचे आणि अपक्ष मिळून अजित पवार यांच्याकडे ४५ हून अधिक आमदार आहेत.
शिंदें सेनेच्या तुलनेत आमच्याकडे आमदार फार कमी नाहीत,
त्यामुळे जागावाटपात शिंदें इतक्याच जागा मिळाव्यात यासाठी अजित पवार यांच्यावर त्यांच्याच गटातील नेत्यांनी दबाव आणला असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकसभेला महायुतीच्या हिताचा विचार करून आपण नमते घेतले आणि चार जागांवर समाधान मानले.
दरवेळी आपणच त्याग का करायचा, अशी भावना आमच्या गटात असल्याचे संबंधित नेत्याने सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Anjali Damania On Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात आज मोठा गौप्यस्फोट! अंजली दमानिया म्हणाल्या – अजित पवारांकडे इतका पैसा येतो कुठून?

Maharashtra Assembly Election 2024 | आज विधानसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकणार, महायुती की मविआ? ओपिनियन पोलची धक्कादायक आकडेवारी समोर

Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या मागणीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ती आमची प्राथमिकताच नाही!’

Kondhwa Pune Crime News | सहदेव महंत रामगिरी महाराजांविरोधात कोंढव्यात गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

You may have missed