Mahendra Thorve Security Guard | आमदाराच्या सुरक्षारक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण; ठाकरे गटाकडून व्हिडिओ व्हायरल

Mahendra Thorve Security Guard

मुंबई: Mahendra Thorve Security Guard | शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षारक्षकाने एका व्यक्तीला रॉडने मारल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena UBT) केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओही ठाकरे गटाकडून पोस्ट करण्यात आला आहे. (Mahendra Thorve Security Guard)

https://x.com/ShivSenaUBT_/status/1833826107436454039?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1833826107436454039%7Ctwgr%5Eb4a484f2a3d2e6d61dd96568790945a34ab770e6%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fpolitics%2Feknath-shinde-mla-security-guard-beating-one-video-viral-from-thackeray-group-maharashtra-politics-marathi-news-1312198

नेरळमधील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. “मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच!”, असा आशय लिहित ठाकरे गटाने समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका कारमध्ये एक व्यक्ती बसला आहे. त्याच्यासोबत बाचाबाची झाल्यानंतर ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हातात दंडुका घेऊन त्या व्यक्तीला मारहाण केली जात आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ठाकरे गटाकडून उपस्थित केला जातोय. महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डचं नाव शिवा आहे, त्याच्याकडून ही मारहाण केली जात असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.

आमदार महेंद्र थोरवे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले,
हे कार्यकर्त्यांमध्ये आपआपसात झालेले मतभेद आहेत. त्याच्याशी माझा संबंध नाही.
मारहाण करणारा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. ते असंच सांगत असतात. ज्याला मारहाण झाली
आणि ज्याने मारहाण केली ते दोघेही आमच्याच पक्षाचे आहेत.

आपआपसांत त्यांचे मतभेद झाले आहेत. नेमकं काय झालंय याबाबत मला कल्पना नाही. मी दर्शन घेण्यासाठी आलो होतो, आता गेल्यानंतर त्याबाबतची माहिती घेईल. आम्हाला सत्तेची मस्ती वगैरे नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. ठाकरे गट त्याच भांडवल करत आहात. संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे थोरवे यांनी सांगितलं.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed