Mahim Assembly Election 2024 | अमित ठाकरेंना भाजपकडून पाठिंबा; शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर म्हणाले – ‘वाटेल त्या परिस्थितीत…’

मुंबई : Mahim Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे (Maharashtra Assembly Election 2024). जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. मनसेने (MNS) यंदा स्वबळाचा नारा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
माहीम विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Group) तसेच शिवसेना शिंदे गटाकडून म्हणजेच (Shivsena Shinde Group) महायुतीकडून (Mahayuti) उमेदवार देण्यात आला आहे. सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार आहेत.
अशातच आता माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी (BJP Support Amit Thackeray In Mahim) अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत विधान केल्यानंतर सदा सरवणकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपने अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत म्हंटल्याने सरवणकर यांना माघार घ्यावी लागणार अशी चर्चा सुरु झाली. दरम्यान शेकडो कार्यकर्ते सरवणकर यांच्या शाखेबाहेर जमले. त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपणाला पूर्ण आशीर्वाद दिला असल्याचे सदा सरवणकर यांनी म्हंटले आहे.
सदा सरवणकर म्हणाले, ” आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतोय. आपल्या येण्याचे कारणही मला कळलं आहे. मिडियामध्ये उमेदवारी मागे घेणार अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. मात्र या बातमीत किंचितही सत्यता नाही.
राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते एकनाथ शिंदेंनी आपल्याला पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे. महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. त्यांची इच्छा एकच आहे, माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा उमेदवार हा इथून निवडून आला पाहिजे.
आपण सर्वजण मागील अनेक वर्षांपासून शिवसेनाप्रमुखांचे आदेश पुढे घेऊन जात आहोत. एकनाथ शिंदेंही शिवसेनाप्रमुखांच्या विचार पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत. म्हणून आपण निश्चिंत राहायला हरकत नाही”, असं सदा सरवणकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हंटले आहे.
ते पुढे म्हणाले, ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आपला पूर्ण विश्वास आहे. त्यांनीच एबी फॉर्म दिला.
त्यांनी फॉर्म कधी भरायचं हे देखील सांगितले. वाटेल त्या परिस्थितीमध्ये दादर, माहीम,
प्रभादेवीमधला आपला उमेदवार निवडून आलाच पाहिजे हे ही त्यांनी सांगितलं. त्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व करु.
त्यांनी आशीर्वाद दिला आहे त्यामुळे ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका.
निश्चिंत होऊन घरी जा. आपण सोमवारी सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार आहोत
त्यामुळे तयारीला लागा”, असेही सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं. (Mahim Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण