Mahim Assembly Election 2024 | माहीम विधानसभा मतदारसंघात महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले – “महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने जपता येईल”

मुंबई: Mahim Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीबरोबरच (Mahavikas Aghadi) सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार हे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. यंदा मनसेने (MNS) स्वबळाचा नारा देत आपले उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत. यामध्ये राज ठाकरेंचे (Raj Thackeray) पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नावाचाही समावेश आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Group) माहिममध्ये महेश सावंत (Mahesh Sawant) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता माहिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
मात्र, यातच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या एका विधानामुळे ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. “अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे”, असं विधान आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केले आहे. त्यामुळे माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुती पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आशिष शेलार म्हणाले, ” अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी बोलणार आहे. ते यासंदर्भात निर्णय घेतील.
यात महायुतीमध्ये कोणताही मतभेद नसला तरी यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे महाराष्ट्राच्या
संस्कृतीला एका अर्थाने जपता येईल असं नातं आपण दाखवलं पाहिजे.
सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही. ते महायुतीचे उमेदवार आहेत,
महायुती म्हणून निर्णय करावा हे माझं म्हणणं आहे”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण